मुख्य बातमीराजकारण

रत्नागिरी “मनसे” कार्यालयाचे उद्घाटन सर्वसामान्य महिलांच्या हस्ते

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) १९ व्या वर्धापनदिनानिमित्त रत्नागिरीतील मनसे कार्यालयाचे उद्घाटन आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आला. भाजी विकून, भंगार गोळा करून आपला संसार सांभाळणाऱ्या आणि रत्नागिरी नगरपालिका महिला सफाई कर्मचारी यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

“हे कार्यालय सर्वसामान्य लोकांचे आहे. यासाठीच आम्ही या महिलांच्या हस्ते या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले आहे. भविष्यात सर्वसामान्य माणसांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. या कार्यालयातून सर्वसामान्य माणसासाठीच कामे केली जाणार आणि त्यांना न्याय मिळवून देणार”, असे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी याप्रसंगी सांगितले.

महिला दिनाचे औचित्य साधून यावेळी कष्टकरी महिला आणि सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा साडी चोळी व संसारोपयोगी साहित्य देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, उपाजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, राजापूर विधानसभा अध्यक्ष जुनेद बंदरकर, रत्नागिरी माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, रत्नागिरी शहर अध्यक्ष बाबय भाटकर, लांजा तालुकाध्यक्ष मनोज देवरुखकर, लांजा शहर अध्यक्ष दिलीप लांजेकर, उपतालुकाध्यक्ष रूपेश चव्हाण, महिला शहरअध्यक्ष सुश्मिता सुर्वे, शहर सचिव संपदा राणा, शहर संघटक बिस्मिल्लाह नदाफ, शेतकरी सेना सतीश खामकर, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम, उपशहर अध्यक्ष गौरव चव्हाण, आदी रत्नागिरी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!