मुख्य बातमीशैक्षणिक

पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या पालक, शिक्षक संघ परिषदेवर दिनेश रुके यांची सदस्यपदी नियुक्ती

आबलोली (संदेश कदम) : पडवे (ता. राजापूर) येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयाची सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षाची शिक्षक पालक संघाची परिषद नुकतीच उत्साहात  झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते दिनेश काशिनाथ रुके यांची दापोली तालुक्यातून पहिल्यांदाच पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय पडवे महाविद्यालयाच्या सदस्यपदी बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आणि दिनेश रुके यांना पालकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली.

या नियुक्तीमुळे दापोली तालुक्यातून दिनेश रुके यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून  अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय पडवे विद्यालयाचे प्राचार्य आणि संघ परिषदेचे अध्यक्ष एम. बसवराज यांनी सर्वांचे स्वागत करून संघ परिषदेला सुरुवात केली. त्यानंतर प्रमोद जाधव यांनी पालक संघ परिषदेच्या सदस्यपदी दापोली तालुक्यातून दिनेश रुके यांच्या नावाची सूचना मांडली. या सूचनेला ओणकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर प्राचार्य एम. बसवराज यांनी दिनेश रुके यांची पालक, शिक्षक संघाच्या परिषदेवर सदस्य पदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले. सामाजिक कार्यकर्ते दिनेश रुके यांच्या दोन्ही मुलींचे जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाल्याने त्या येथे शिक्षण घेत आहेत. त्यामुळेच सामाजिक कार्यकर्ते दिनेश रुके यांची पीएम या विद्यालयाच्या पालक, शिक्षक संघ परिषदेवर सदस्यपदी नियुक्ती झाली. या परिषदेचे सूत्रसंचालन नागेश शेंडगे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!