मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
बालभारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी तहसीलदार, पोलिसांना राख्या बांधून साजरे केले रक्षाबंधन

आबलोली (संदेश कदम) : अंजनवेल (ता. गुहागर) येथील बालभारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी पोलीस ठाणे गुहागर येथील पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्यासह पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना तसेच गुहागरचे कार्यतत्पर तहसीलदार परीक्षित पाटील यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
यावेळी विद्यार्थ्यांसोबत शाळेचे प्राचार्य सुरजित चटर्जी, शाळेचे शिक्षक राहुल हेगीष्टे, सौ. जान्हवी आर्यमाने आदी उपस्थित होते.



