मुख्य बातमी

तडीपारीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या सूचना 

नाको-ओर्डीनेशन जिल्हास्तरीय समिती बैठक

रत्नागिरी : ज्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तडीपारीची प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यांनी ती तात्काळ निकाली काढावीत. जनजागृत्ती मोहीमेत सहभाग घेऊन पोस्टर्स स्पर्धेत अमली पदार्थ विरोधात पोस्टर्स काढणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले जाईल, असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सांगितले.

नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज (३० एप्रिल) झाली. या बैठकीला पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आदी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्ह्यातील व्यसनमुक्ती केंद्रांची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी घ्यावी. शिक्षण विभागाने पोस्टर्स स्पर्धा घेऊन चांगले काम केले आहे. त्याची प्रदर्शन भरवावे.

जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, ज्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तडीपारीची प्रलंबित प्रकरणे आहेत, ती तात्काळ निकाली काढावीत. पुढील बैठकीत पोस्टर्स स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल. सर्वच विभागानी अंमली पदार्थाच्या विरोधात सतर्क राहून कारवाई करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!