मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागर आगारात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) : रा. प. गुहागर आगारामध्ये १४ एप्रिल रोजी अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती असा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे

हा जयंती महोत्सव सकाळी १० वाजता रा. प. गुहागर आगारात संपन्न होणार असून या जयंती महोत्सवाला आगार व्यवस्थापक अशोक चव्हाण प्रवाशी संघटना अध्यक्ष पराग कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती रहाणार असून या जयंती महोत्सवाला आगारातील सर्व अधिकारी व कर्मचारी अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

यावेळी “गुलामगिरी” पुस्तकाचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला गुहागर तालुक्यातील सर्व नागरिकांनी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित रहावे असे, आवाहन रा. प. आगारातील सर्व कर्मचारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!