मुख्य बातमी

उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या मुलींसाठी मुक्त वसतिगृह

पुणे : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक प्रशिक्षण, इंटर्नशिप तसेच नोकरीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने विद्यार्थीनी आणि कामकाजी महिला पुण्यात येत असतात. अशा मुलींसाठी सुरक्षित, स्वच्छ, शिस्तबद्ध आणि परवडणाऱ्या निवासाची मोठी गरज लक्षात घेऊन पुण्यातील नांदेड सिटी परिसरात “संत भगवानबाबा कृपा एसबीके छात्रालय” या मुलींसाठी मुक्त व सुरक्षित वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

हे वसतिगृह विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागातून येणाऱ्या मुलींसाठी उपयुक्त ठरणार आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अमरावती, जळगाव, लातूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली यांसह राज्यातील विविध भागांतील मुली येथे सुरक्षित वातावरणात राहू शकतात.

हे वसतिगृह ओपन युनिव्हर्सिटी संकल्पनेप्रमाणे सर्वांसाठी खुले असून, महाविद्यालयीन शिक्षण, स्पर्धा परीक्षा, सरकारी किंवा खाजगी नोकरी, प्रशिक्षण, इंटर्नशिप तसेच विविध व्यावसायिक कारणांसाठी पुण्यात येणाऱ्या मुली व महिलांना प्रवेश दिला जातो. कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक संस्था किंवा पारंपरिक मर्यादांशी बांधील नसलेली ही मुक्त व लवचिक निवास व्यवस्था आहे.

वस्तीगृहात २४ तास सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही निगराणी, स्वच्छ पिण्याचे पाणी, वाय-फाय सुविधा, अभ्यासासाठी शांत वातावरण, मेस सुविधा, कपडे धुण्याची सुविधा तसेच प्रवासासाठी सुलभ कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थिनींसोबतच इंटर्न, प्रशिक्षणार्थी आणि कामकाजी महिलांसाठीही ही सुविधा खुली आहे.

सध्या मासिक शुल्क केवळ ४,५०० रुपये ठेवण्यात आले असून प्रवेश शुल्क २०० रुपये इतके आहे. सुरक्षित आणि कौटुंबिक वातावरणात राहण्याची सुविधा देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. संत भगवानबाबा कृपा (एसबीके) छात्रालय हे नांदेड सिटी, पुणे येथे दादांची पुण्याई, पवार पब्लिक स्कूल समोर, जनारंजनी जवळ या परिसरात स्थित आहे.

अधिक माहितीसाठी डॉ. सुवर्णा कराड यांच्याशी ८६२६०६१३५१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!