हस्ताक्षर स्पर्धेत पाटपन्हाळे विद्यालयाचे सुयश
अभिज्ञा पवार, कस्तुरी घाणेकर व सृष्टी पालशेतकर प्रथम

आबलोली : न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. यात अ, ब आणि अकरावी- बारावी गटात अभिज्ञा दिनेश पवार, कस्तुरी संतोष घाणेकर व सृष्टी रूपेश पालशेतकर या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम क्रमांक संपादन केला.
कोकण कट्टातर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. यात अ गटात (इयत्ता पाचवी- सहावी) अभिज्ञा दिनेश पवार (पाचवी), स्वरा शैलेश गावडे (सहावी), रूची संजय तुप्ते (पाचवी) यांनी तीन क्रमांक, तर शौर्य सुजित जोशी (सहावी) व युगा रूपेश किर्वे (पाचवी) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक संपादन केला. ब गटात (सातवी ते नववी) कस्तुरी संतोष घाणेकर (आठवी), गायत्री विश्वास भिडे (नववी), ओजस्वी सुधीर वासनिक (नववी) यांनी प्रथम तीन क्रमांक, तर शमिका योगेश धामणस्कर (नववी) अथर्व अनिल घाणेकर (सातवी) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. इयत्ता अकरावी ते बारावी गटात सृष्टी रूपेश पालशेतकर (अकरावी कला शाखा), रूपेश उदय माटल (अकरावी कला शाखा), अनुष्का अनंत धनावडे (अकरावी वाणिज्य शाखा) यांनी प्रथम तीन क्रमांक, तर अमृता अशोक घरवे (अकरावी विज्ञान शाखा) व आर्या अशोक ठोंबरे (अकरावी वाणिज्य शाखा) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक संपादन केला.
स्पर्धेत सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे आयोजक कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातर्फे मुख्याध्यापिका सौ. एस. एस. चव्हाण यांनी अभिनंदन केले. स्पर्धेसाठी पाटपन्हाळे विद्यालयातील शिक्षक एस. वाय. भिडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. गुहागर तालुक्यातील पालपेणे हायस्कूल , मुंढर हायस्कूल, नातू प्रतिष्ठानचे पाचेरीआगर विद्यालय या विद्यालयांमध्ये ही स्पर्धा झाली. स्पर्धेतील सुशस्वी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनी आयोजकांतर्फे बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. तसेच न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील अलोक प्रतीक पवार याचे इन्स्पायर अवॉर्ड व उत्कृष्ट विज्ञान प्रतिकृतीसाठी निवड झाली. त्यानिमित्त त्याचा सत्कार करण्यात आला.



