भाजपा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष यांचा मंडल दौरा प्रारंभ

रत्नागिरी : भारतीय जनता पक्ष दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव हे चार तालुक्यांतील मंडलांच्या दौऱ्यावर आहेत. श्री. यादव यांनी काल संगमेश्वर उत्तर आणि दक्षिण, लांजा उत्तर आणि दक्षिण, राजापूर पूर्व आणि पश्चिम या मंडलाना भेट देत तेथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. पक्ष संघटना मजबूत होण्याकरिता हा दौरा नक्कीच फायदेशीर ठरेल, असे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी सांगितले.
संघटनात्मक आढावा तसेच प्रदेशस्तरावरून आलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा प्रत्येक मंडल अध्यक्षांकडून घेण्यात आला. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना पक्षाची भूमिका व्यवस्थितरित्या समजावत मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, अभिजीत गुरव, शीतल पटेल, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष लियाकत शहा, मंडल अध्यक्ष विनोद म्हस्के, रूपेश कदम, विराज हरमले, शैलेश खामकर, मोहन घुमे, एकनाथ मोंडे उपस्थित होते.


