मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
देवरुख परिसरात विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

संगमेश्वर : तालुक्यात देवरुखच्या आसपास भागात सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी सुद्धा याच दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली होती, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे.
दुपारी ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि पुढील तासभर पावसाचा जोर होता. तालुक्यातील कोसुंब, काटवली, सोनवडे, बोरसूत, वाशी, देवळे, बुरंबी आदी परिसरात पाऊस जोरात होता.



