आरोग्यमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आलोरे येथे उरूसनिमित्त मोफत वैद्यकीय शिबिर

चिपळूण : तालुक्यातील आलोरे येथे कोकणचे गरीब नवाज शहानुर बाबा चिस्ती (र.अ.) सरकार (मिनी अजमेर) यांचा उरूस शुक्रवारी (२० मार्च) रोजी भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. या उरूसानिमित्त विविध वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये फिजिओथेरपी (भौतिकोपचार) तज्ञ डॉ. करणकुमार कररा (MPTH), कार्डिओ-पल्मनरी तज्ञ व KIMS Rank Holder यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच दंतचिकित्सा क्षेत्रातील तज्ञ डॉ. श्रीजीत रणजीत पाटील (BDS, KLE बेलगावी, MGD) ALAD hyr हेही उपस्थित राहून सेवा देणार आहेत. याशिवाय, रात्री कोल्हापूर येथील सुतार बंधू यांच्या “ऑर्केस्ट्रा झंकार” या करमणुकीच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

परिसरातील सर्व नागरिकांनी या मोफत वैद्यकीय शिबिराचा तसेच करमणुकीच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!