मुख्य बातमी

“ब्राउन हॅरॉईन”सदृश्य अमली पदार्थ विक्री करणारा इसम ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

रत्नागिरी : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना नाचणे रोड ते गुरुमळी जाणाऱ्या रोडवर आडोशाला एक इसम संशयास्पद हालचाली करत असल्याची गोपनीय माहिती पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार त्यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अदनान नाजीममियाँ नाखवा (वय २५ वर्षे, रा. १५७, ब, जुना फणसोप, ता. जि. रत्नागिरी) हा आपल्या दुचाकी वाहनावर बसून संशयीत हालचाली करत असताचे निदर्शनास आले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून ब्राउन हॅरॉईन सदृश्य अमली पदार्थाच्या १५४ पुड्या व १ दुचाकी वाहन असा एकूण २ लाख ५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त हस्तगत करण्यात आला असून, त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने धडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले आहे.

पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे रत्नागिरी शहरात ७ एप्रिल रोजी गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे नाचणे रोड ते गुरुमळी जाणाऱ्या रोडवर आडोशाला संशयीत आरोपी अदनान नाखवा हा आपल्या दुचाकी वाहनावर बसून संशयीत हालचाली करीत असताना दिसून आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकामार्फत त्याची चौकशी करून त्याच्या ताब्यातील पिशवी पंचांच्या समक्ष तपासण्यात आली. यात ब्राउन हॅरॉईन अमली पदार्थाच्या एकूण १५४ पुड्या व इतर साहित्य आढळले. पथकाने अदनान नाखवा याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १३३/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून ब्राउन हॅरॉईन सदृश्य अमली पदार्थाच्या १५४ पुड्या व १ दुचाकी वाहन असा मिळून एकूण २ लाख ५ हजार रुपये किंमतीचा मुद्दे माल जप्त केला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी रत्नागिरी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. ढेरे, सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पो.हवा शांताराम झोरे, पो.हवा नितीन डोमणे, पो.हवा बाळू पालकर व पो.हवा गणेश सावंत यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!