रत्नागिरी पोलीस दलात बेल्जियन मालिनॉइस श्वान दाखल

रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकात एका अत्यंत हुशार आणि चपळ समजल्या जाणाऱ्या बेल्जियन मालिनॉइस जातीच्या श्वानाचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या श्वानाचे “लिओ” आहे नामकरण केले.
बेल्जियन मालिनॉइस ही जात तिच्या अफाट कार्यक्षमता, तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि धाडसासाठी जगभरातील सुरक्षा दलांमध्ये प्रसिद्ध आहे. रत्नागिरी पोलीस श्वान पथकात या जातीचा श्वान पहिल्यांदाच दाखल झाल्यामुळे गुन्हे अन्वेषण आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलीस दलाची ताकद अधिक वाढणार आहे.
याप्रसंगी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि श्वान पथकाचे मार्गदर्शक उपस्थित होते. नव्याने दाखल झालेला हा “लिओ” आगामी काळात पोलीस प्रशासनाला गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी आणि विविध आव्हानात्मक मोहिमांमध्ये मोलाची मदत करेल, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.



