मुख्य बातमी
विधानपरिषद निवडणूक आचारसंहितेमुळे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा स्थगित

रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी या कार्यालयामार्फत आज ( २० मे) रोजी आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता १८ मेपासून लागू झाल्यामुळे पुढील आदेशापर्यंत स्थगित केला असल्याने सर्व उमेदवार, प्रशिक्षण संस्था, महाविद्यालये व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी दिली.
रोजगार मेळाव्याच्या नियोजनाबाबत नवीन दिनांक व ठिकाण यांची माहिती लवकरच कळविण्यात येईल.


