मुख्य बातमी

डॉ. जे. एस. केळकर मेमोरियल फाउंडेशनतर्फे गरजू महिलांना ‘रुबी’ बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप

रत्नागिरी : आरोग्य, कौशल्य विकास, पर्यावरण संवर्धन तसेच विविध सामाजिक उपक्रमांत गेली अनेक वर्षे सातत्याने अग्रेसर असणाऱ्या डॉ. जे. एस. केळकर मेमोरियल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने रत्नागिरी शहर आणि परिसरातील गरजू महिलांसाठी एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत महिलांना नाविन्यपूर्ण आणि अधिक आरोग्यदायी अशा ‘रुबी’ बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करण्यात आले.

या नाविन्यपूर्ण सॅनिटरी नॅपकिन्सचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्णपणे ‘बायोडिग्रेडेबल’ (पर्यावरणपूरक आणि विघटनशील) आहेत, ज्यामुळे महिलांचे आरोग्य जपण्यासोबतच पर्यावरणाची हानी देखील टळणार आहे.

या मोहिमेमध्ये प्रामुख्याने समाजातील कष्टकरी घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. रत्नागिरी शहर व परिसरातील घरकाम करणाऱ्या तसेच बांधकाम मजूर असणाऱ्या सुमारे ५० हून अधिक महिलांना या सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप करून त्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली.

फाउंडेशनच्या या कौतुकास्पद उपक्रमामुळे रत्नागिरीतील कष्टकरी महिला वर्गातून समाधान व्यक्त होत असून, संस्थेच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

“डॉ. जे. एस. केळकर मेमोरियल फाउंडेशन नेहमीच समाजातील वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत राहिले आहे. आगामी काळातही समाजातील उपेक्षित, कष्टकरी आणि गरजू महिलांचे आरोग्य व जीवनमान सुधारण्यासाठी संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातील.”

— सौ. अश्विनी ऋषिकेश केळकर (कार्यकारी संचालक, डॉ. जे. एस. केळकर मेमोरियल फाउंडेशन)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!