मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आशिष महाजन यांना भरपाई देण्याची मागणी

चिपळूण : बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले तोंडली-वारेली येथील आशिष महाजन यांना नुकसान भरपाई द्या, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी वनविभागाकडे केली आहे. तसे लेखी पत्र विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्याकडे दिले आहे.

श्री. सावंत म्हणाले, महाजन यांच्या उपचाराचा खर्च वनविभाग करणार आहे; परंतु फक्त उपचाराचा खर्च करून भागणार नाही. त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. तशी तरतूद वनविभागाकडे आहे. सुदैवाने, महाजन बचावले आहेत; परंतु दुर्दैवाने अनर्थ घडला असता तर? या परिसरात बिबट्याचा वावर आहे हे संबंधित अधिकाऱ्यांना माहिती होते. वर्षभरापूर्वी येथून जवळच एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. त्यामुळे वनविभागाने गंभीर दखल घेणे आवश्यक होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!