आरोग्यमुख्य बातमीशैक्षणिक

जि. प. शाळा पूर्णगड नं.१ मध्ये आरोग्यविषयक मार्गदर्शन उपक्रम उत्साहात 

रत्नागिरी : तालुक्यातील जि. प. शाळा पूर्णगड नं. १ या शाळेत प्राथमिक आरोग्य केंद्र पावस अंतर्गत पूर्णगड उपकेंद्र यांच्यामार्फत साथीचे रोग, यावेळी कोणती काळजी घ्यावी तसेच आरोग्यविषयक माहिती, एचपीव्ही लसीकरण यांचे पालक व विद्यार्थी यांना आरोग्य सेवक अनिल धोपटे, श्रीमती पावसकर यांनी मार्गदर्शन केले.

या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती, पालक उपस्थित होते. आरोग्य विषयक चांगली माहिती दिल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका भारती तायशेटे यांनी सर्वांचे आभार मानले. उपक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी परिश्रम घेतले. शाळेच्या या उपक्रमाविषयी केंद्रप्रमुख संजय राणे यांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!