पावसाळी क्रीडा स्पर्धेत कोळवली हायस्कूलचा मुलांचा रिले संघ विजेता

आबलोली (संदेश कदम) : रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ मध्ये घेण्यात आलेल्या पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत देवघर (ता. गुहागर) येथे झालेल्या पावसाळी क्रीडा स्पर्धेत गुहागर तालुक्यातील ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचलित, माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली या विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलांच्या रिले संघाने 4*100 मी. रिले या प्रकारामध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
आर्यन मते, रसिक पाष्टे, श्रेयस सोलकर, साहिल माटल आणि करण भुवड या खेळाडूंनी अतिशय चमकदार खेळ करत अंतिम सामन्यांमध्ये सर्व संघावर मात करून गुहागर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. यामुळे या खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांताराम वाघे, उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, सचिव नारायण मोहिते, खजिनदार वासुदेव डिंगणकर, शंकर जोशी, संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच मुख्याध्यापक विजय पिसाळ यांनी विजयी खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षक बाळासाहेब लवटे, कर्मचारी विकास कदम या सर्वांचे अभिनंदन करून जिल्हा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



