कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

शिवराज्य दिन आणि शिवराज्याभिषेक सोहळा

रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर शिवभक्तांचा अभूतपूर्व महासागर उसळला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून, दऱ्याखोऱ्यातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. संपूर्ण गड ‘शिवमय’झाला आहे. अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या या अथांग गर्दीमुळे रायगडावरील प्रत्येक कडा भगव्या रंगात न्हाऊन निघाला आहे. ‘जय भवानी,जय शिवाजी’च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून शिवभक्तांचा उत्साह गगनात मावेनासा झाला आहे. शिवभक्तांच्या जनसागराचा ड्रोन व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.

किल्ले रायगडावर ६ जून रोजी ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला लाखोंच्या संख्येने शिवभक्त रायगडावर पोहोचले आहेत. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

“११९८ पोलीस कर्मचारी, १५० पोलीस अधिकारी, ३ आरसीपी, एक एसआरपी टीम,ड्रोन कंट्रोल टीम यासह अन्य अधिकारी वर्ग शिवभक्तांच्या सुरक्षिततेसाठी तैनात असणार आहेत. आज किल्ले रायगडावर पायी निघालेल्या शिवभक्तांना पायरी मार्गावर देखील पोलीस तैनात केले जाणार आहेत. पार्किंगचा परिसर ते किल्ले रायगड अशी पोलिसांची विशेष टीम या ठिकाणी असणार आहे”, अशी माहिती आंचल दलाल यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!