मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

लांजा येथील काजू फॅक्टरीमधील चोरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून उघडकीस

९ लाख ४१ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत : दोघे ताब्यात 

लांजा : कोत्रेवाडी येथील काजू फॅक्टरी फोडून काजूगर चोरून नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी असा एकूण ९ लाख ४१ हजार, ८७९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा गुन्हा २८ मे रोजी सायंकाळी ६ ते २९ मे रोजी ९.२० या कालावधीत घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वर दिलेल्या कालावधीत कोत्रेवाडी येथील फिर्यादी यांच्या झिमण्स कश्यु पॉईंट हीकाजू फॅक्टरी फोडून काजूगर चोरून नेल्याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ११२/२०२६ भा.न्या.सं. चे कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकाने घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना गोपनीय माहीतीचे आधारे शाहरुख मुराद साखरकर (वय ३०, रा. भाट्ये नवानगर रत्नागिरी), वजीद मोहम्मद अझीझ खान (४१ वर्षे, रा. बजार रोड, शिया मस्जीद समोर, बांद्रा पश्चिम मुंबई सध्या रा. भाट्ये, जामा मस्जीद शेजारी, रत्नागिरी) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले एक चारचाकी वाहन असा एकूण ९,४१,८७९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास लांजा पोलीस करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दतात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, श्रे.पो. उपनिरीक्षक संदीप ओगले, सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष भागणे, पोलीस हवालदार विजय आंबेकर, अमित कदम, दीपराज पाटील, चालक पोलीस शिपाई अतुल कांबळे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!