मुख्य बातमी

पर्यावरण दिनी “मत्स्यम”चा अनोखा उपक्रम

खवय्ये - पर्यटकांना वितरित केले देशी झाडांचे सिडबॉल्स

रत्नागिरी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत येथील “मत्स्यम”ने अनोखा उपक्रम राबवत पर्यावरण दिनी दिवसभर येणाऱ्या खवय्यांना सीड बॉल्स भेट दिले.

रत्नागिरीचे मत्स्यम गेल्या काही वर्षांपासून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. यापूर्वी मत्स्यमने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सिडबॉल्स वितरित केले होते. हीच परंपरा कायम ठेवत यावर्षी दिवसभरात मत्स्यमला भेट देणाऱ्या खवय्यांना सिडबॉल्स दिले. माती आणि शेणाच्या गोळ्यात वाळवलेल्या बिया या निमित्ताने वितरित झाल्या. वेगाने कमी होत असलेल्या आपल्या देशी झाडांच्या बियांचा यात समावेश होताच, पण त्याचबरोबर काही औषधी झाडे, आंबा आणि फणस यांचाही यात समावेश होता.

मत्स्यमच्या या उपक्रमाचे सगळ्यांनीच भरभरून कौतुक केले आहे. व्यवसायाबरोबर मत्स्यम जपत असलेल्या सामाजिक भानाचे यावेळी कौतुक झाले. २०१९ मध्ये मत्स्यमने सर्वप्रथम तत्कालीन वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबवला होता. या उपक्रमासाठी देशी झाडांचे बीज आणि बॉल्स उपलब्ध करून देणाऱ्या सगळ्या मंडळींचे मत्स्यम सचिन देसाई, पल्लवी माने, आशिष वजरेकर यांनी विशेष आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!