मुख्य बातमी

कोकण दर्शनमध्ये सफर गणपतीपुळे आणि सागरी पर्यटनाची; १२ जून रोजी प्रसारण

रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कोकण दर्शन या कार्यक्रमात यावेळी प्रसिद्ध क्षेत्र गणपतीपुळे आणि तिथल्या सागरी पर्यटन याविषयीची सफर घडणार आहे. १२ जून रोजी या कार्यक्रमाचं आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी प्रसारण होणार आहे.

कोकण दर्शन ही मालिका आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून दर शुक्रवारी प्रसारित करण्यात येते. यावेळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून रत्नागिरी मधले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री गणपतीपुळे इथले उपक्रम, इथले उत्सव, इथली डोंगर प्रदक्षिणा,ग्रामदेवता चंडिका मंदिर याविषयीची माहिती आपल्याला मिळणार आहे. गणपतीपुळेचा समुद्रकिनारा पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो मात्र इथे समुद्र स्नानाचा आनंद घेताना पर्यटकांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी देखील मार्गदर्शन या कार्यक्रमामधून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. या कार्यक्रमात संस्थान श्री गणपतीपुळेचे अध्यक्ष नीलेश कोल्हटकर, स्थानिक महिला आणि भाविक सौ. पद्मजा जोशी आणि जीवरक्षक उमेश महाद्ये यांचा सहभाग आहे.

या कार्यक्रमाचे लेखन सौ. सोनाली सावंत यांनी केले असून निवेदन आणि निर्मिती सहाय्य सौ. सोनाली सावंत आणि सौ. वंदना मुसळे यांचे आहे. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे हे आहेत.

हा कार्यक्रम मध्यम लहरी 1143 किलो हर्ट्स या वाहिनीवर,एफएम वाहिनी 101.5 मेगा हर्टझ आणि newsonair या लाईव्ह मोबाईल ॲप वर प्रसारित होईल. या कार्यक्रमाचे प्रसारण झाल्यानंतर airratnagiri1248 या युट्यूब चॅनलवरही हा कार्यक्रम श्रोते ऐकू शकतील. रत्नागिरीतील विविध पर्यटन स्थळांची माहिती देणारा कोकण दर्शन हा कार्यक्रम सर्वांनी अवश्य ऐकावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!