मुख्य बातमी

“गांजा” सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कारवाई

रत्नागिरी : शहरातील शिरगांव शेट्येवाडी येथे गांजा सेवन करणाऱ्या दोघांना शहर पोलिस ठाण्याच्या गस्ती पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत शहरा पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. शब्बीरअली शहानवाड़ा पटेल (२८, रा. घर नंबर २२५, रहेबर मोहल्ला, साखरतर, ता. जि. रत्नागिरी) आणि शफाकत हसन आदम राजपुरकर (३६, रा. घर नंबर २२२, अकबर मोहल्ला, साखरतर, ता. जि. रत्नागिरी) अशी त्यांची नावे आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या असल्याने त्या अनुषंगाने १९ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस पथक रत्नागिरी शहरात गस्त घालत होते. हे पथक शहर पोलीस ठाणे हद्दीतील शिरगांव, शेट्येवाडी या ठिकाणी गस्त घालत असताना महालक्ष्मी मेडिकल स्टोअरच्या पाठीमागे दोन इसम बसून चिलीम सदृश्य साहित्याच्या सहाय्याने तोंडातून वारंवार धूर काढत असल्याचे निदर्शनास आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने त्यांची खात्री केली असता ते गांजा हा अमली पदार्थ ओढत असल्याने निष्पन्न झाले.

शब्बीरअली शहानवाड़ा पटेल आणि शफाकत हसन आदम राजपुरकर, यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्या अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर १५२/२०२५ अन्वये दाखल करण्यात आलेला असून, अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहे.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, सपोफौ सुभाष भागणे, पोहवा शांताराम झोटे, बाळू पालकट, प्रवीण खांबे, अमित कदम, गणेश सावंत, विवेक रसाळ, योगेश शेट्ये यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!