कोतवडे इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण उत्साहात

रत्नागिरी : कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित तालुक्यातील श्री. वि. प. कोतवडे इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण सोहळा १५ जून रोजी शाळेच्या सभागृहामध्ये पार पडला.
यावेळी कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष गजानन पेडणेकर, उपाध्यक्ष संजय मयेकर, शाळा समिती अध्यक्ष नरेश कांबळे उपस्थित होते. कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन सुरेश नाईक यांनी स्वागत केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन तसेच मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पालक देखील बहुसंख्येने उपस्थित होते. त्यांचे देखील संस्था पदाधिकाऱ्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या व शिक्षकांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. यावेळी प्रथमच नेवरे, धामणसे, बसणी या गावातून कोतवडे हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्याने कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ईशा पेडणेकर यांनी तर प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत गुरुदास खुळे यांनी केले. दत्ताराम लिंगायत यांनी आभार मानले. कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी ज्येष्ठ शिक्षक सुरेश नाईक, ज्येष्ठ शिक्षिका शिल्पा सुर्वे, फलक लेखन विक्रम बागुल, सविता मोहिते, आशिष जाधव, सुभाष खरात, सचिन कोलगे, शरदचंद्र कुंभार, शिक्षकेतर कर्मचारी संदीप कोलगे, प्रमोद पांचाळ, गीता खांडके यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या व अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन केले. या स्वागतोत्सव कार्यक्रमामुळे पालक व विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावरती आनंद व समाधान व्यक्त होत होते.


