मुख्य बातमी

रत्नागिरी येथील संविधान प्रेमी नागरिकांतर्फे पहलगाम पर्यटकांना श्रद्धांजली 

रत्नागिरी : दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. या २७ पर्यटकांना श्रद्धांजली देण्यासाठी रत्नागिरी येथील जयस्तंभ या मध्यवर्ती ठिकाणी दररोज सायंकाळी मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात येते.

हा कार्यक्रम २७ दिवस म्हणजेच दिनांक २० मेपर्यंत चालणार असून या कार्यक्रमासाठी दीपक राऊत, बशीर मुर्तुजा, संजय वैशंपायन, काका तोडणकर, अस्लम शेख, सत्तार मुल्ला, सुरेश ओसवाल, भैय्या वणजू, संकेत कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

दहशतवाद्यांनी देशामध्ये धार्मिक संघर्ष निर्माण करण्याचा कुटील डाव खेळला असला तरी संविधान प्रेमी नागरिक तो यशस्वी होऊ देणार नाहीत, असा विश्वास बशीर मुर्तुजा यांनी व्यक्त केला. सर्व भारतीय नागरिक यासाठी एक असून अशा दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असाही विश्वास व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!