मुख्य बातमी

भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत सामंजस्य करार पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न

रत्नागिरी : कोकणच्या आणि विशेषतः रत्नागिरीच्या दळणवळण व सुरक्षा क्षेत्राच्यादृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा असलेला भारतीय तटरक्षक दल (ICG) व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, मर्या. (MADC) यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

हॉटेल सावंत पॅलेस येथे आयोजित या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे,आमदार किरण सामंत, प्रशासकीय अधिकारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, MADC दीपक कपूर, द कमांडिंग ऑफिसर कुणाल सी. नाईक, जिल्हाधिकारी मनुज जिंदल , मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

विमानतळाच्या या सामंजस्य करारामुळे केवळ नागरी विमान वाहतुकीलाच नव्हे, तर किनारपट्टीच्या सुरक्षेला आणि स्थानिक पर्यटनाला देखील मोठी चालना मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!