लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीच्या अध्यक्षपदी ला. प्रथमेश गायकवाड; पदग्रहण सोहळा उत्साहात

रत्नागिरी : मराठा भवन येथे लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी क्लबच्या अध्यक्षपदी ला. प्रथमेश गायकवाड यांनी पदभार स्वीकारला.
या सोहळ्यास इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून पीडीजी पीएमजेएफ लायन जगदीश पुरोहित उपस्थित होते. तसेच झोन चेअरमन एमजेएफ लायन सौ. शिल्पा पानवलकर, डिस्ट्रिक्ट ॲक्टिव्हिटी चेअरमन एमजेएफ लायन पराग पानवलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी मार्गदर्शन करताना झोन चेअरमन लायन शिल्पा पानवलकर म्हणाल्या, “लायन्स क्लबचे सदस्य नेहमीच समाजसेवेसाठी पुढाकार घेत असतात. प्रत्येक क्लब स्वतंत्रपणे सेवा कार्य करत असला, तरी सर्व क्लबांनी एकत्रितपणे उपक्रम राबविल्यास सेवाकार्याची व्याप्ती वाढेल आणि परस्परांतील स्नेहसंबंध अधिक दृढ होतील.”
सोहळ्यात अध्यक्षपदी ला. प्रथमेश गायकवाड, सचिवपदी ला. भक्ती प्रथमेश गायकवाड, खजिनदारपदी लायन अभिजित पंडित आणि प्रथम उपाध्यक्षपदी ला. धनश्री धनंजय पालांडे यांनी पदाची शपथ घेतली.
याशिवाय द्वितीय उपाध्यक्षपदी ला. प्रदीप मोरे, टेमर म्हणून लायन दर्शन पवार, सहसचिव म्हणून लायन अमित पटेल, टेल ट्विस्टर म्हणून लायन वैभव पाटील, जीएसटी चेअरमन म्हणून लायन हितेंद्र पटेल, जीएमटी चेअरमन म्हणून लायन श्रीकांत पाटील, जीएलटी चेअरमन म्हणून ला. ओंकार पाटील, मार्केटिंग व कम्युनिकेशन प्रमुख म्हणून ला. निलेश पटेल तसेच चेअरपर्सन म्हणून ला. महेश पटेल, ला. जान्हवी द. पवार, ला. वसंत पटेल आणि ला. हितेश पटेल यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाला क्लबचे बीओडी सदस्य ला. प्रविण मलुष्टे, एमजेएफ ला. नितीन कुलकर्णी, ला. रश्मी प्रविण मलुष्टे, ला. जयंत जोशी, ला. जयश्री जोशी आणि ला. सूर्यकांत जाधव उपस्थित होते. यावेळी साईप्रसाद खोत आणि तुषार सावंत यांचे नवीन सदस्य म्हणून स्वागत करून त्यांना पिन प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन धनश्री पालांडे यांनी केले. उपस्थितांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


