मुख्य बातमी

कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे एसटी कार्ड नोंदणीला प्रतिसाद

रत्नागिरी : कुवारबाव परिसरातील नागरिकांना एसटी आगारात न जाता ही कार्ड सुलभरित्या कुवारबाव येथे मिळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ कुवारबाव यांच्या विद्यमाने आयोजित शिबिरात काल (७ जुलै) दिवसभर मे. इम्बिक्स कॅश टेक्नॉलॉजी कंपनीमार्फत २२५ जणांची नोंदणी करण्यात आली.

सध्या १२ ते ७५ वर्षांपर्यंत महिलांना निम्मे व ७५ वर्षांवरील महिलांना निःशुक्ल्क तसेच पुरुषांसाठी ६५ नंतर निम्मे शुल्क व ७५ नंतर मोफत प्रवास करता येतो. त्यासाठी वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड दाखवावे लागते. आता त्याऐवजी एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले आहे. या कार्डाचे वितरण करण्यासाठी मे. इम्बिक्स कॅश टेक्नॉलॉजी या कंपनीची नेमणूक एसटी महामंडळाने केली आहे.

यासाठी संघाचे अध्यक्ष श्री. आंब्रे, उपाध्यक्ष राजेंद्र कदम, सचिव सुरेश शेलार, सदस्य श्यामसुंदर सावंत, प्रकाश बोरकर, श्रीमती घाणेकर, शुभांगी भावे, सुवर्णा चव्हाण, वृषाली शेट्ये यांनी मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी कंपनीचे दीपक तराळे यांचा संघातर्फे शाल, श्रीफळ व पुष्पं देऊन सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!