वालावलकर रुग्णालयात भव्य महाशस्त्रक्रिया शिबिर
मधुमेह रुग्णांच्या पायांवरील जखमा आणि मूळव्याधीवर आधुनिक लेसर उपचार

चिपळूण : ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा देणाऱ्या भ. क. ल. वालावलकर रुग्णालयात १५ ते १८ जुलै या कालावधीत विविध आजारांवर महाशस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात प्रामुख्याने ‘डायबेटीस फूट’ (मधुमेहातील पायाच्या जखमा) या आजारवर अल्पदरात उपचार करण्यात येतील तसेच ‘लेसर प्रोक्टोलॉजी’ (गुदद्वाराशी संबंधित आजार) यांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत व सवलतीच्या दरात अत्याधुनिक उपचार केले जाणार आहेत.
मधुमेहामुळे (डायबेटीस) रुग्णांच्या पायाला गंभीर जखमा होण्याचा, सूज येण्याचा किंवा संसर्ग (इन्फेक्शन) होण्याचा धोका असतो. वेळीच उपचार न केल्यास पाय गमवावा लागण्याची भीती असते. या पार्श्वभूमीवर हे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.आजार असल्याची लक्षणे असल्यास रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा. पायावर बरी न होणारी जुनी जखम असणे. पायाला मुंग्या येणे, जळजळ होणे किंवा पाय बधिर पडणे. पायाला सूज येणे, पू होणे किंवा संसर्ग होणे. अशा रुग्णांना या शिबिराचा फायदा होणार आहे.
१७ व १८ जुलै रोजी लेसर प्रोक्टोलॉजी (गुदद्वाराशी संबंधित आजार) उपचार शिबिरात गुदद्वाराशी संबंधित आजारांवर आधुनिक लेसर उपचार लेसर प्रोक्टोलॉजी उपचार तज्ञांकडून तपासणी व उपचार उपलब्ध मुळव्याध (गुदद्वारातील सूज, रक्तस्राव व वेदना), फिस्टुला ( गुदद्वाराजबळील नळी, पू येणे व वारंवार संसर्ग), फिशर (शौचाच्या वेळी तीव्र वेदना व रक्तस्राव) या आजारवर मोफत आधुनिक लेसर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिबिराचा लाभ कोकणवासियांनी घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, शिबिरात मिळणाऱ्या सुविधा तज्ज्ञ डॉक्टरांकडून पायाची सखोल व अत्याधुनिक तपासणी, जखमेवर विशेष उपचार आणि ड्रेसिंग, औषधोपचार, तज्ज्ञांचा सल्ला आणि पायाच्या काळजी बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. हे उपचार रुग्णालयाकडून अल्पदरात करण्यात येतील.


