रत्नागिरीत १६ ऑगस्टला जिल्हास्तरीय अभिवाचन स्पर्धा

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा रत्नागिरीच्या वतीने जिल्हास्तरीय मराठी अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील हौशी कलाकारांच्या वाचिक अभिनय कौशल्याला वाव देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा १६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजल्यापासून पटवर्धन हायस्कूल (रत्नागिरी) येथे पार पडेल.
ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना (सांघिक आणि वैयक्तिक) रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नाट्यप्रेमी व वाचकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले आहे.
इच्छुक स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी ९ ऑगस्टपर्यंत करणे आवश्यक आहे. अधिक माहिती व प्रवेशासाठी सौ. अनुया बाम – 9284752787 या क्रमांकावर संपर्क साधावा.



