सामाजिक कार्यकर्ते सुरेश उर्फ पोपट शिंदे यांचे निधन

रत्नागिरी : येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश उर्फ पोपट शिंदे (वय ६६) यांचे गुरुवारी (१६ जुलै) एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
रत्नागिरीतील जुने रिक्षाचालक म्हणून ते परिचित होते. ४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी रिक्षा व्यवसाय केला. आरोग्यदूत म्हणून ते ४० वर्षांहून अधिक काळ ते निःस्वार्थ कार्य करत होते. गोरगरीब रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी ते स्वतः धडपड करत. एक आरोग्य कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. धनगर समाज संघटनेतही त्यांनी काम करताना धनगर समाजासाठी प्रचंड योगदान दिले आहे.
काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानंतर व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. गुरुवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.


