मुख्य बातमी
माजी सैनिक संवर्गातून विशेष निधीतून अशासकीय कर्मचारी भरती

रत्नागिरी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण व माजी सैनिक विश्रामगृह दापोली येथे कंत्राटी तत्वावर माजी सैनिक संवर्गातून अशासकीय कर्मचारी भरावयाचे आहेत. इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात ३१ जुलैपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
सहाय्यक वसतिगृह अधीक्षक १ पद व पहारेकरी १ पद ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्जदार माजी सैनिक असणे गरजेचे आहे. माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास माजी सैनिक विधवा / अवलंबित व माजी सैनिक किंवा माजी सैनिक विधवा/ अवलंबित उपलब्ध न झाल्यास इतर म्हणजेच नागरी संवर्गातून ही पदे भरली जाणार आहेत.


