शैक्षणिक

नवोदय विद्यालयात इयत्ता नववी आणि अकरावी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

रत्नागिरी : पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, पडवे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे सत्र २०२७-२८ साठी इयत्ता ९ वी आणि ११ वी मधील रिक्त जागांच्या पार्श्वभूमीवर प्रवेश परीक्षेची (LEST) ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्णपणे मोफत अर्ज करता येईल. ही प्रवेश परीक्षा १० एप्रिल २०२७ रोजी घेतली जाईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य एन. के. एफ. ठाकूर यांनी केले आहे.

हे विद्यालय केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत १०० टक्के अनुदानित सह-शैक्षणिक निवासी विद्यालय असून येथे मोफत शिक्षण, वसतिगृह व भोजनाची उत्तम सोय उपलब्ध आहे. अर्जदार विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्याचा मूळ रहिवासी असावा. ९ वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी सध्या ८ वीत, तर ११ वीच्या प्रवेशासाठी सध्या १० वीत शासकीय किंवा शासनमान्य शाळेत शिकत असावा.

प्रवेशासाठी विद्यार्थ्याचा फोटो व सही (१०-१० KB, JPG फॉरमॅट), पालकांची स्वाक्षरी (१०-१० KB, JPG फॉरमॅट), APAAR ID / PEN आणि आधार कार्डाची माहिती हे कागदपत्र आवश्यक आहेत.

अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक्स:

इयत्ता ९ वी: https://cbseitms.nic.in/2026/nvsix_9

इयत्ता ११ वी: https://cbseitms.nic.in/2026/nvsxi_11

पालकांच्या मदतीसाठी विद्यालयात मोफत हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे. अर्जात खोटी माहिती आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. अधिक माहितीसाठी परीक्षा प्रमुख आर. ए. पाटील यांच्या ९४२३३३२८८१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!