भातगाव गोळेवाडी येथे १६ सप्टेंबरला गणपती विसर्जन तलावाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन
उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुवर्धन सभापती महेश नाटेकर यांची प्रमुख उपस्थिती

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील भातगाव गोळेवाडी येथे १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांच्या हस्ते गणपती विसर्जन तलावाचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, कुणबी समाजोन्नती संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पाते, गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोलीचे चेअरमन रामचंद्र हुमणे, व्हाईस चेअरमन तुकाराम निवाते, पाचेरी सडा पंचायत समिती गणाच्या सदस्या सौ. सुचिता घाणेकर, शिवसेना तवसाळ गट अध्यक्ष प्रदीप सुर्वे, शिवसेना युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर काजरोळकर, स्वीय्य सहाय्यक विजय मोहिते, पाचेरी गणाचे विभाग प्रमुख विशाल गोताड, कुणबी समाजोन्नती संघ तवसाळ गटाचे अध्यक्ष शंकर जोशी, शिवसेना महिला आघाडी तवसाळ गटाच्या उपाध्यक्षा सौ. रेणुका आग्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गणपती विसर्जन तलावाच्या लोकार्पण सोहळ्याचे संपूर्ण आयोजन भातगाव गोळेवाडी येथील ग्रामस्थांनी केले आहे.



