मुख्य बातमी

सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी

रत्नागिरी : तालुक्यातील पाली येथील डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज आषाढी एकादशी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पूर्व प्राथमिक ते माध्यमिक पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करत टाळांच्या गजरात भव्य दिंडीचे आयोजन केले.

विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचा ठेका धरत पारंपरिक वेशभूषेत लक्ष वेधून घेतले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि दिंडीच्या ठेक्यात विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर करत संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. या कार्यक्रमांतर्गत “प्रत्येक निरक्षर व्यक्ती साक्षर होऊ” हा मुख्य उपक्रम राबवण्यात आला.

या दरम्यान विद्यार्थ्यांनी साक्षरतेचा प्रसार करणारी विविध प्रभावी घोषवाक्ये व स्लोगन्स हातात घेऊन समाजप्रबोधन केले. विद्यार्थ्यांच्या दिंडीसोबतच शिक्षकांनी देखील विशेष सहभाग नोंदवला. शाळा परिसरात रिंगण आखून, विठोबाच्या भक्तीत तल्लीन होत शिक्षकांनी अत्यंत सुंदर व आकर्षक रिंगण नृत्य सादरीकरण केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!