मुख्य बातमी

आंबेशेत येथील रत्नागिरी नगरपालिका शाळा क्र. १९ मध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

रत्नागिरी : आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राची संतपरंपरा जपत रत्नागिरी नगरपालिका शाळा क्र. १९ आंबेशेतमध्ये शाळेत पारंपरिक दिंडी तसेच शासन पत्रकान्वये साक्षरता दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत साक्षरता व शिक्षणाचे महत्त्व घोषवाक्यांद्वारे समाजापर्यंत पोहोचविले. यानिमित्ताने आनंददायी शनिवार उपक्रमही उत्साहात राबविण्यात आला.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक नागेंद्र कणमुसे, विनय कांबळे, सौ. वर्षा म्हादे, शुभम पेटकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संचिता सचिन भाटकर, महिला मंडळाच्या प्रतिनिधी, पालकवर्ग, अंगणवाडी सेविका तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. पालकांचे सहकार्यही मोलाचे लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!