मुख्य बातमी

गावखडी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. २९ जुलै रोजी सकाळी ७ वाजता गुरूदेव श्री दास दिगंबर स्वामीच्या हस्ते श्री स्वामी समर्थ देवाचे पूजन व स्वामी देवाच्या चरणांवर अभिषेक, सकाळी ९ वाजता श्री स्वामी समर्थ आणि ओम दिगंबराय नमो मंत्राचे पठण, सकाळी ११ वाजता श्री दासदिगंबर स्वामी यांचे स्वागत, त्यानंतर भक्तगणाकडून गुरूदेवचरणाचे पाद्यपूजन, ११.३० वाजता गुरूमहती व नमन श्री गुरूचरण पोथीचे पठण, दुपारी १२ वाजता भक्तगणांचे गुरूदेवा प्रति समर्पित प्रतिपादन, १२.४५ वाजता गुरूदेव श्री दासदिगंबर स्वामीचे आशीर्वचन, १.३० वाजता महानैवेद्य अर्पण व महाआरती होईल. त्यानंतर भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाईल. श्री दासदिगंबर स्वामी चरण दशन सोहळा, संध्याकाळी ६.३० वाजता भक्तगणासाठी विशेष तिमिरातून तेजाकडे नेणारा दीपोत्सव सोहळा होईल. रात्री ८ वाजता नित्याच्या आरती, ९ वाजता भजनाचा कार्यक्रम होईल.

या कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गुरूवर्य दासदिगंबर महाराज यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!