गयाळवाडी येथील अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील धनावडेवाडी बंधाऱ्यात अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाला. सार्थक सुहास गुरव (वय १६, रा. गयाळवाडी, रत्नागिरी असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गयाळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सार्थक हा रविवारी सकाळी आपल्या मित्रांसोबत कारवांचीवाडी धनावडेवाडी येथील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेला होता. मित्रांसोबत पोहण्यात आनंद घेत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने सार्थ हा पाण्यात बुडाला यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने सार्थला बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सार्थक याला मृत झाल्याचे घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.



