महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे खेडमध्ये स्वागत; विकासकामांवर चर्चा

खेड : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे भरणे नाका, खेड येथे भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा खेड शहर आणि भाजपा युवा मोर्चाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी खेड शहर व तालुक्यातील विविध विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. याप्रसंगी भाजपा आमदार प्रमोद जठार, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले, नगरसेविका वैभवी खेडेकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी, शहर उपाध्यक्ष राहुल पाटणे, शक्तीकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद (दादू) नांदगांवकर, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशा सनगरे, उपशहराध्यक्षा मिनल गुहागरकर, तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विशाल होळकर, उपाध्यक्ष अविराज मोरे, शहर चिटणीस राकेश चव्हाण, मंदार आपटे, शशांक सिनकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष स्वराज गांधी, उपाध्यक्ष रूपेश तावडे, संभाजी देवकते, माजी नगरसेवक संदेश भुवड, अनिल सनगरे, बाळू वर्मा, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, जयेश गुहागरकर, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



