कुंभवे येथे वर्षावास प्रवचन कार्यक्रम उत्साहात

दापोली : तालुक्यातील कुंभवे येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दापोलीतर्फे आयोजित वर्षावास प्रवचन मालिका २०२६ अंतर्गत कुंभवे ग्रामशाखेत वर्षावास प्रवचन कार्यक्रम धम्ममय वातावरणात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक शाखाध्यक्ष रमेश तांबे होते.
जिल्हा शाखा रत्नागिरीच्या संस्कार विभागाचे सचिव विकास पवार यांनी ‘भगवान बुद्धांचे आरोग्यशास्त्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी उपासक-उपासिकांना भगवान बुद्धांच्या विचारांतील आरोग्यविषयक दृष्टिकोन समजावून सांगितला. प्रारंभी प्रतिमापूजन व सूत्रपठण झाले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष अनिल घाडगे, कोषाध्यक्ष अनंत जाधव, आनंद शेळके, दीपक धोत्रे, बाबुराव जाधव, संदीप धोत्रे यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन कौस्तुभ कासारे यांनी केले. अध्यक्षीय भाषणानंतर आभारप्रदर्शन व सरणत्तयाने कार्यक्रमाची सांगता झाली.


