मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

कुटगिरी येथे लोखंडी साकव कोसळून बैलाचा मृत्यू

नुकसानग्रस्त शेतकऱ्याला १८ तासांच्या आत शासकीय मदत सुपूर्द

गुहागर : तालुक्यातील कुटगिरी येथील भैरी शंकर मंदिरानजीक तिजग नदीवरील लोखंडी साकव सोमवारी सायंकाळी कोसळल्याने आठ जनावरे त्यामध्ये अडकली होती. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्व आठ जनावरांना बाहेर काढण्यात यश आले.

आठ जनावरांपैकी दिलीप नारायण लिंगायत यांच्या मालकीचा एक बैल मृत झाला तर उर्वरीत जनावरे किरकोळ जखमी झाली. पशुवैद्यकीय विभागाने तातडीने जखमींवर उपचार व मृत बैलाचे शवविच्छेदन पूर्ण केले. मृत बैलाच्या अनुषंगाने शेतकरी श्री. लिंगायत यांना रक्कम रुपये ३२ हजार रुपये शासकीय आर्थिक सहाय्य धनादेश आज (४ ऑगस्ट) सकाळी उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार गुहागर परीक्षित पाटील, मंडळ अधिकारी पाटपन्हाळे अनिल राठोड व ग्राम महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.

प्रांताधिकारी यांनी जखमी जनावरांवर आवश्यक उपचार कायम ठेवण्याच्या सूचना पशुवैद्यकीय विभागाला केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!