मुख्य बातमी

टिळक आळी गणेशोत्सव मंडळ आयोजित रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकुट

टिळक आळी गणेशोत्सव मंडळ आयोजित रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकु

 

रत्नागिरी : श्री मारुती – गणपती पिंपळपार देवस्थान, टिळक आळी, गणेशोत्सव मंडळ (वर्ष – १०१) आयोजित रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाणने दुहेरी मुकुट पटकावला. महिला गटात राजापूरच्या निधी सप्रे हिने आकांक्षा कदम हिच्यावर विजय मिळवून महिला गटात विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हातून सर्व गटातून सुमारे २५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात राष्ट्रीय खेळाडू रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाण याने चिपळूणच्या दिपक वाटेकर याच्यावर २५-१०, १८-२५, २५-१६ अशा संघर्ष पूर्ण सामन्यात मात करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

जिल्हा मानांकन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या रियाज अकबर अली व अभिषेक चव्हाण या जोडीने चिपळूणच्या अभिजित खेडेकर व दीपक वाटेकर या जोडीचा १५-०४, २००० असा पराभव करून पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. पुरुष वयस्कर गटात देवरूखच्या राहुल भस्मेने राष्ट्रीय खेळाडू संतोष जोगळेकर यांचा संघर्षपूर्ण लढतीत २५-०४, १४ – १७,२५-०१ तर महिला एकेरी गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा कदम हिचा राजापूरच्या निधी सप्रे हिने २५-१४, २५-१० असा पराभव करून अनुक्रमे पुरुष वयस्कर व महिला गटाचे विजेतेपद पटकाविले.

किशोर गट (मुले) या गटात आदित्य देसाई (लांजा) याने हर्ष कदम (गुहागर) याचा २५-००, २५-०१ तर कुमार गट (मुले) या गटात ओम पारकर (रत्नागिरी) याने आर्यन राऊत (गुहागर) याचा पराभव करून त्या त्या गटाचे विजेतेपद पटकाविले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला मंडळाचे विश्वस्त अरुण करमरकर, माजी सेक्रेटरी राहुल काळे, श्री. भाऊ तेरेदेसाई, स्पर्धा प्रमुख मनोहर केळकर, प्रदीप भाटकर (अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), नितीन लिमये, विवेक देसाई, विनय गांगण, सचिन बंदरकर, मंदार दळवी, सागर कुलकर्णी व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!