मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

भरणे येथे क्रेटाच्या धडकेत किया कार उलटली 

खेड : तालुक्यातील भरणे गवळवाडी येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या क्रेटा कारने पुढे जाणाऱ्या किया कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर किया कार रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास

झालेल्या या अपघातात कर्टेल गावचे सरपंच दिनेश चव्हाण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातानंतर किया कारमधील चालक वाहनात अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्थानिकांच्या प्रयत्नांतून कारमध्ये अडकलेल्या चालकाची सुखरूप सुटका करण्यात आली.

दरम्यान, अपघातानंतर क्रेटा कारमधील चौघांनी घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. क्रेटा कारमधील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!