मुख्य बातमी

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महाउपलब्धी’ ॲपच्या प्रभावी वापराबाबत ६ ऑक्टोबर रोजी मार्गदर्शन

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या ‘महाउपलब्धी’ ॲपच्या प्रभावी वापराबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी ६ ऑक्टोबर रोजी श्री शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेत ‘महाउपलब्धी’ या ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना मिळणाऱ्या सुविधांची सविस्तर माहिती दिली जाईल. पेन्शनसंबंधित विविध कामांसाठी हे ॲप कसे उपयुक्त ठरेल, याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.

जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!