मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

वालोपे (चिपळूण) येथे दोन कारची धडक; चार जखमी

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे (ता. चिपळूण) येथील सीएनजी पंपासमोर आज (९ ऑगस्ट) दुपारी दोन चारचाकी वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात चौघे जखमी झाले. हा अपघात दुपारी सुमारे ३.२० वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रिबल कार (क्र. एमएच ०८ एएक्स ६४९६) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार प्रथम महामार्गावरील डिव्हायडरला धडकली. त्यानंतर ही कार साईडच्या लेनमध्ये गेली आणि समोरून चिपळूणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वॅगनार कारला (क्र. एमएच ४३ सीके ८८४०) जोरदार धडकली.

या अपघातात मयुरेश ढेबे, सायली शिर्के, अभिषेक शिर्के आणि मानसी प्रधान हे चौघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच चिपळूण गव्हर्मेंट रेस्ट हाऊसजवळ तैनात असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानची २४ तास अपघात सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना पुढील उपचारासाठी चिपळूण येथील लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!