मुख्य बातमी
गुहागर तालुका कुणबी पतसंस्थेची १६ ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लि. आबलोली या पतसंस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या रविवारी (१६ ऑगस्ट) रोजी सकाळी ११ वाजता पतसंस्थेच्या आबलोली येथील प्रधान कार्यालयातील सभागृहात पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सभेला सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. हुमणे, उपाध्यक्ष तुकाराम निवाते, ज्येष्ठ संचालक पांडुरंग पाते, संचालक प्रदीप बेंडल, महादेव वणे, संदेश कदम, वैभव आदवडे, उदय गोरीवले, अमोल वाघे, संचालिका श्रीम. वनिता डिंगणकर, सौ. श्रावणी पागडे, तज्ञ संचालक अनंत पागडे, संदीप पास्टे, कार्यलक्षी संचालक अनिल घाणेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.



