मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

भाजपा युवा मोर्चा खेड शहर चिटणीसपदी निकेत भालेकर, तर उपाध्यक्षपदी सनीप वळवणकर

खेड : शहरातील भाजपा युवा मोर्चा संघटना मजबूत करण्यासाठी भाजपा नेते तथा खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निकेत भालेकर यांची भाजपा युवा मोर्चा खेड शहर चिटणीस पदी, तर सनीप वळवणकर यांची भाजपा युवा मोर्चा खेड शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगरपालिकेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा खेड शहर चिटणीस अनिकेत पवार, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष पियुष माने, रोहित तांबे, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य श्वेत चोगले यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!