Uncategorized

समृद्धी आंबेकरचा प्रा. जहूर बोट सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्काराने गौरव

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील प्लाईट एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट शृंगारतळी व युनिटेक कम्प्युटर एज्युकेशनतर्फे शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ चा प्रा. जहूर बोट सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाची दहावीमधील विद्यार्थिनी समृद्धी सुरेश आंबेकर हिने संपादित केल्याबद्दल अभिनंदन होत आहे.

हा कार्यक्रम शृंगारी उर्दू हायस्कूलमध्ये नुकताच संपन्न झाला. गुहागर तालुका विज्ञान शिक्षक मंडळातर्फे आयोजित केलेल्या विद्यार्थी पारितोषिक कार्यक्रम व व पेटंट विषय मार्गदर्शन कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार प्रशस्तीपत्र, गौरव चिन्ह, पुस्तक, शालेयपयोगी भेटवस्तू व पुष्पगुच्छ या स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कार्यक्रमासाठी चिपळूणमधील डीबीजे कॉलेजचे पेटंट प्रदानित प्रा. सुहास वाघमोडे, प्रा.जहूर बोट, रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष सुदेश कदम, गुहागर तालुकाध्यक्ष श्री. पाटील, सचिव श्री. शिवणकर, जिल्हा सदस्य श्री. घुटुकडे, शृंगारी उर्दू हायस्कूल मुख्याध्यापिका श्रीमती शगुप्ता, देवघर हायस्कूलचे मुख्याध्यापक राऊत, मुनवर शेख, विलास लादे आदी मान्यवर उपस्थित होते.

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाची विद्यार्थीनी समृद्धी आंबेकर हिने प्रा. जहूर बोट सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार संपादन केल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी, मुख्याध्यापिका एस. एस. चव्हाण, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मित्रपरिवार, पत्रकार आदींनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!