मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
आबलोली बाजारपेठेतील विठ्ठल रखुमाई मंदिरात श्रीराम मंदिर लुटीविरोधात ठाकरे सेनेची “रामरक्षा महाआरती”

आबलोली (संदेश कदम) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली आबलोली येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात श्रीराम मंदिरातील १४ कोटी लुटीविरोधात ठाकरे सेनेची “रामरक्षा महाआरती” उत्साहात संपन्न झाली.
यावेळी जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव, तालुका प्रमुख सचिन बाईत, तालुका सचिव विलास गुरव, विनायक मुळ्ये, माजी सभापती पूर्वी निमुणकर, रवींद्र आंबेकर, नरेश निमुणकर, जगदीश गडदे, रमेश नेटके (माऊली), अजित रेपाळ, रवींद्र रेपाळ, प्रवीण भंडारी, महेश दिंडे, प्रमोद नेटके, शरद साळवी,संतोष पालशेतकर, तृशांत सुर्वे, प्रथमेश निमुणकर, शिवाजी गुरसळे, ऋषिकेश बाईत आदी सेनेच्या कार्यकर्त्यांसमवेत गुहागर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.



