मुख्य बातमी

लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील लढ्यात ॲड. आसीम सरोदे घेणार सहभाग

रत्नागिरी : जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी येथे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी विरोधात गेले अनेक महिने आंदोलने सुरू आहे. ही कंपनी ताबडतोब बंद व्हावी ही आग्रहाची मागणी असून त्यावर स्थानिक प्रशासन किंवा सरकारकडून काहीच हालचाल होत नसल्याने या कंपनीच्या विरोधातील कोकण नागरी संघर्ष समितीतील शिष्ट मंडळाने ॲड. आसीम सरोदे यांची रत्नागिरी येथे भेट घेतली व घडलेल्या सर्व घटनांची माहिती दिली.

ही कंपनी तात्काळ बंद व्हावी याकरिता आपली साथ मिळावी, अशी मागणी केली. यावर ॲड. आसीम सरोदे यांनी सर्व आंदोलनाला माझा पाठिंबा असल्याची ग्वाही दिली व या लढ्यात मी देखील सहभागी होणार असल्याचा शब्द दिला तसेच सर्व रत्नागिरीकरांना या लढ्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!