मुख्य बातमी
ज्येष्ठ पत्रकार, माजी नौसैनिक अरुण आठल्ये यांचे निधन

लांजा : खानू येथील ज्येष्ठ पत्रकार आणि माजी नौसैनिक अरुण कृष्णानाथ आठल्ये (वय ७८) यांचे शनिवारी (२९ ऑगस्ट) रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, पुतणे असा परिवार आहे.
अरुण आठल्ये यांनी नौसैनिक म्हणून देशसेवा बजावली होती. निवृत्ती पत्करल्यानंतर ते पत्रकारितेत सक्रिय होते. विशेष बातम्या (स्पेशल स्टोरी) करण्यात त्यांचा हातखंडा होता.



